योग प्रशिक्षणाचा हॉकी खेळाडूंच्या समन्वय घटकावर होणारा परिणाम

  • दिनेश कराड Ph. D. संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा, मा.गां. वि . समाजाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड , जि. नाशिक (महाराष्ट्र)
Keywords: हॉकी खेळाडू, समन्वय, योग प्रशिक्षण

Abstract

हॉकी खेळाच्या खेळाडूंना आपले कौशल्य सादर करताना उत्तम प्रकारचे समन्वय आवश्यक असते.ही गरज योगद्वारे पूर्ण केली जाऊ शकते का हे पाहण्यासाठी नाशिक शहरामधील २१ वयोगटातील एकूण २५ पुरुष खेळाडूंची सहेतुक पद्धतीने निवड करण्यात आली.सदर संशोधनासाठी प्रायोगिक पद्धत वापरण्यात आली. बॉल ट्यापिंग कसोटी (समन्वय) माहिती संकलनाचे साधन म्हणून वापरण्यात आली.सांख्यिकीय विश्लेषणासाठी मध्यमान, प्रमाणविचलन, मध्यमानातील फरक, यांचा वापर करण्यात आला.योगामुळे हॉकी खेळाडूंच्या समन्वय व कौशल्य कार्यमान या घटकावर योग प्रशिक्षणाचा सार्थक परिणाम होतो हे स्पष्ट झाले.
Published
2021-08-01