अध्ययन-अध्यापनाच्या गुणवत्ता विकासात संगणक व बहूमाध्यमे (मल्टिमिडीया) यांच्या उपयोगाचे विविधांगी दृष्टिकोन

  • सज्जन थूल मार्गदर्शक, य. च. म. मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • मनीषा गुलाबराव पाटील संशोधक विद्यार्थी, य. च. म. मुक्त विद्यापीठ, नाशिक
Keywords: बहुमाध्यमे, संगणक सहाय्यित अनुदेशन, अध्ययन-अध्यापनात उपयोग, अनुदेशन प्रक्रिया, माहितीचे सादरीकरण, मनोरंजनातून अध्ययन

Abstract

वर्तमान काळात अध्ययन-अध्यापनाची प्रभावात्माकता वाढविण्यात व शिक्षण प्रक्रियेत नाविन्यपूर्णता टिकवून ठेवण्यात सर्वात महत्वाची भूमिका संगणक व बहुमाध्यमे निभावत आहेत. बहुमाध्यम (मल्टिमिडीया) हे माहिती तंत्रज्ञानातील महत्वाची शाखा म्हणून उदयास आलेले आहे. मल्टिमिडीया म्हणजे टेक्स्ट, ग्राफिक्स, फोटोग्राफ, अॅनिमेशन-व्हिडीओ, ऑडीयो डिव्हाईस यांचा वापर करुन विविध प्रकारच्या कलाकृती तयार करणे होय. मल्टिमिडीयात व्हिडीओ, संगीत, ध्वनी, चित्रालेख आणि मजकुर या सर्व प्रकारच्या माध्यमांचे एकत्रीकरण असते. मल्टिमिडीया म्हणजे विषयवस्तू, ध्वनी, लेखाचित्र, चित्रातील जिवंतपणा आणि दृश्य इत्यादी माहितीचे एकत्रित सादरीकरणे होय. यात फोटोग्राफ, लेखाचित्र, संगीत, ध्वनी, दृश्य, चित्रातील जिवंतपणा, विषय वस्तू इत्यादी बाबींचा समावेश होतो. मल्टिमिडीयात तांत्रिक सजृनशीलतेबरोबरच कलात्मक कल्पनाशक्तीलाही भरपूर वाव आहे. मोठ-मोठे चित्रकोश, माहितीकोश, शब्दकोष या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका छोट्या सीडीवर किंवा हार्ड डिस्क अथवा पेनड्राईव वर रुपांतरीत केले जातात. विविध प्रकारची प्रेझेंटेशन्स, शैक्षणिक माहिती, विज्ञानाचे प्रयोग, उत्पादनाची माहिती अतिशय कमी कालावधीत व जलदगतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे हे केवळ मल्टिमिडीयामुळे शक्य झाले आहे. संगणक हा बहुमाध्यामांचा सर्वात महत्वाचा व अविभाज्य घटक आहे. त्यामुळे विनासंगणक बहुमाध्यांचा विचार करता येणार नाही. शिक्षण क्षेत्रातही या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि रुची टिकवून ठेवणे या साधनांमुळे शक्य झाले आहे. कितीही कठीण व क्लिष्ट विषय असला तरी या साधनाच्या माध्यमाने सोपा करून शिकविता येतो. अध्ययन-अध्यापनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी संगणक व बहुमाध्यमांशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही.
Published
2021-10-01