शिक्षकाचे व्यक्तिमत्व समृद्धी आणि व्यावसायिक विकास विषयक अपेक्षा व बदलते संदर्भ

  • सज्जन थूल मार्गदर्शक, य. च. म. मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • मनीषा गुलाबराव पाटील संशोधक विद्यार्थी, य. च. म. मुक्त विद्यापीठ, नाशिक
Keywords: .

Abstract

आजच्या विज्ञान युगात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने बदल होत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आश्चर्यजनक परिवर्तने घडून येतांना दिसत आहेत. समाजाच्या गरजा व अपेक्षा बदलत आहेत. त्याच बरोबर समस्यांचे स्वरुप व क्षेत्र हे व्यापक होत आहे. अशा परिस्थितीत शिक्षण हे मध्यस्थानी आलेले आहे. आपली शिक्षण पध्दती विद्यार्थी केंद्रित असली तरीही शिक्षकाचे महत्व आजही पूर्णत्वाने टिकून आहे. शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना शिकवित नसतो तर तो विद्यार्थ्यांना भविष्यासाठी घडवित असतो. असा हा शिक्षक जुन्या विचारसरणीचा असून चालणार नाही तर तो काळानूसार व येणाऱ्या नवनविन विचार प्रवाहांच्या अनुसार बदलला पाहिजे. विश्व बदलायचे असेल तर राष्ट्र बदलले पाहिजे, राष्ट्र बदलायचे असेल तर समाज बदलला पाहिजे व समाज बदलायचा असेल तर व्यक्ती बदलायला पाहिजे. अर्थातच व्यक्ती हा फक्त शिक्षणातूनच बदलू शकतो व शिक्षणातून व्यक्ती बदलण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकातच आहे. विश्व बदालाची प्रक्रिया ही शिक्षकापासून सुरु होत असते. यासाठी शिक्षकाने स्वत:ला सर्वांगिण विकसित करणे, सतत अध्ययनशील असणे, आपल्या कौशल्यांचा विकास करणे, स्वत:चे मुल्यमापन करणे, ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे, राष्ट्रीय विकासातील स्वत:चे योगदान समजून घेणे व आजचा विद्यार्थी हा राष्ट्राचे भविष्य आहे या दृष्टीने विद्यार्थी विकासासाठी झटणारा व तळमळ करणारा अशी स्वता:ची प्रतिमा व आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे. अर्थातच या आधुनिक बदलत्या काळानुसार शिक्षकाने स्वत:चे व्यक्तिमत्व समृध्द करण्याबरोबर आधुनिक काळाशी सुसंगत व्यावसायिक विकास करणे आवश्यक झाले आहे.
Published
2022-05-01