प्रथम व द्वितीय वर्ष बी.एड्. विद्यार्थी शिक्षकांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा तुलनात्मक अभ्यास

  • अनिल नारायण निघोट सहाय्यक प्राध्यापक, डॉ. एम.ए. खान कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), मंचर
  • राजमाने . कस्तूर सहाय्यक प्राध्यापक, डॉ. एम.ए. खान कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), मंचर
Keywords: भावनिक बुद्धिमत्ता (EQ), विद्यार्थी शिक्षक (ST)

Abstract

स्वतःचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक आवश्यकतांची पुर्ती करून जीवन सफल बनविण्यासाठी मनुष्य जीवनात भावनेस अनन्य साधारण महत्व आहे. आपले कुटुंब, मित्र आणि समाजातील सहज शिक्षण, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातून मनुष्य आपल्या मनातील भाव-भावना आणि विचारांच्या अभिव्यक्तीसाठी आणि द्विमार्गी संप्रेषणासाठी भाषा व भावनेस अनन्य-साधारण महत्व आहे. साल्वी व मेअर यांच्या मते आपल्या विचार व कृतींसाठी भावनांचा योग्य उपयोग करणे व तसे शिकविणे याचा संबंध भावनिक बुद्धिमत्तेशी असल्याने विद्यार्थी, शिक्षकांची भावनिक परिपक्वता, अभिव्यक्ती, भावना व्यवस्थापन व इतरांच्या भावना समजून घेण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांची (ST) भावनिक बुध्दिमत्ता विकसित झाल्यास व्यक्तीच्या त्याच्या मार्गातील अडथळे सर्वांच्या सहकार्याने दूर करून समाधान व यश मिळते. यासाठी संशोधकाने पेठे, हैद व धर यांच्या चाचणीद्वारे भावनिक बुद्धिमत्ता जाणून घेऊन सहकार्यात्मक अध्ययनाधिष्ठित कार्यक्रमाच्या (CLP) अंमलबजावणीने EQ मध्ये सकारात्मक बदल दिसून आला. संशोधकाने प्रथम व द्वितीय वर्ष बी.एड्. विद्यार्थी शिक्षकांची भावनिक बुद्धिमत्ता जाणून त्याचा तुलनात्मक अभ्यास केला आहे.
Published
2022-09-01