अपंगत्व असलेल्या युवतींच्या विकाससाठी पालकांचे प्रयत्न: एक अभ्यास

  • सुनिता काशिनाथ जगताप संशोधक म.वि.प्र. समाजाचे, समाजकार्य महाविद्यालय, नाशिक
  • प्राचार्य विलास देशमुख म.वि.प्र. समाजाचे, समाजकार्य महाविद्यालय, नाशिक
Keywords: .

Abstract

समाजातील अपंग व्यक्तीच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यातील असलेल्या सुप्त सामर्थ्य विकासा करण्याच्या दृष्टीने कार्य करण्याची वेळ आली आहे. समाजजीवनाच्या सर्व दृष्टीने समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे या दृष्टीने केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक प्रशासन,तसेच अपंगांसाठी कार्य करत असलेली मंत्रालया कार्यरत आहेत. सदर यंत्रणा अपंग विकासासाठी योजना, कार्यक्रम, उपक्रम, धोरण निर्मिती व अंमलबजावणी करताना आपल्याला दिसत आहे. मानवी हक्क दृष्टिकोण तसेच सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सर्व प्रयत्न होत आहेत पण अपंग व्यक्तीला सक्षम करण्यासाठी कुटुंबातून काय काय प्रयत्न केले जातात हे अभ्यासणे गरजेचे आहे कारण व्यक्ती विकासाच्या माध्यम म्हणून आपण शाळेकडे बघत आहोत पण शाळा हे संपूर्ण माध्यम नाही तर इतरही काही माध्यमे आहेत जसे कुटुंब, शेजारी, बाह्य परिस्थिती, प्रसारमाध्यमे इत्यादी.
Published
2023-01-01