अध्ययन अक्षम मुलांचे शैक्षणिक समावेशन स्वरुप व उपाय

  • श्रीमती मीना शेंडकर संशोधक विद्यार्थीनी, सेवासदन शिक्षणशास्त्र महाविद्यालय, उल्हासनगर- 421 003.
Keywords: .

Abstract

विश्वातील मनुष्य जातीच्या सुखी, समृद्ध व संपन्न जीवनाकरीता आपण सर्व मनुष्याच्या एकंदरीत कल्याणाचा व ‘जगा व जगू द्या’ या तत्वाप्रमाणे कार्य करीत असतो. मानवी जातीच्या जीवनात विविध गुण वैशिष्टे असतात. बुद्धिमत्तेच्या व अध्ययन क्षमतेच्या आधारावर बालकांचे वर्गीकरण विविध पातळीवर केले जाते. उदा. कुशाग्र बुद्धिमत्ता असणारी बालके, सरासरी बुद्धिमत्ता असणारी बालके, अध्ययन अक्षम बालके इ. सर्व बालके शिक्षण समान पातळीवर घेऊ शकत नाही. तथापि सर्वांचे शिक्षण व्हावे याकरीता प्रत्येकाच्या गतीने शिकण्यासाठी विभिन्न परिस्थिती असणे आवश्यक आहे. या सर्वांचा विचार करून अध्ययन अक्षम मुले सहजपणे शिकू शकतात. याकरीता योग्य संधी व सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या अनुषंगाने या शोध निबंधात विचार, संशोधन करून अध्ययन अक्षम मुलांच्या शिकण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.
Published
2023-01-01