आदिवासी स्त्री जीवन

  • विनोद विठ्ठलराव जाधव समाजशास्त्र विभाग प्रमुख, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी ता. निलंगा जि. लातूर
Keywords: .

Abstract

जगातील सर्वच देशात कमी अधिक प्रमाणात आदिवासी समाज आढळून येतो. जगाच्या तूलनेत भारतातील आदिवासींची लोकसंख्या लक्षणिय आहे. डोंगर, द-या खो-यामध्ये राहणारा हा समाज प्रगत समाजापासून अलिप्त आहे. भारताच्या चौफेर दिशांनी आदिवासी विखूरलेला आहे. त्यांना वेगवेगळ्या नावानी संबोधले जाते. ठक्कर बाप्पा यानी ‘मुळ निवासी’ डॉ.धूर्ये यांनी ‘मागासलेले हिंदु’ एलविन यांनी ‘गिरीजन’ तर भारतीय राज्यघटनेत ‘अनुसूचित जमाती’ असा उल्लेख आहे. गिलीन व गिलीन यांच्यामते, “एका विशिष्ठ भूप्रदेशात राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा व समान सांस्कृतीक जीवन जगणारा पण अक्षरओळख नसलेल्या व्यक्तिच्या समुच्चयाला आदिवासी असे म्हणतात.” आदिवासी मध्ये अनेक जाती, उपजाती आहेत. प्रत्येकाची जीवनपध्दती, मुल्य, श्रध्दा, आचार-विचार,प्रथा-परंपरा ठरलेली आहे. त्या त्या विशिष्ठ भूप्रदेशातच ती जात मोठ्या प्रमाणात आढळून येते.
Published
2021-03-25