भारतातील स्त्रियांची अवस्था आणि दिशा

  • छाया शशिपाल शिंदे मविप्र समाजाचे, के. टी. एच. एम. महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक
Keywords: .

Abstract

'तदेतत् अर्धद्विदलं भवति' स्त्री-पुरुष समान आहेत असं वरील संस्कृत वचनातून सांगितलं असलं, तरी प्राचीन काळापासून आजपर्यंत नेहमीच स्त्री श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ असा वाद सुरूच आहे. आजच्या काही स्त्रियांनी अतिउच्च प्रगती करून देशाच्या विकासातील आपला वाटा उचलला. प्राचीन काळी आध्यात्म मार्गातील धोंड म्हणून स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. तर त्या आधीच्या काळात मैत्रेयी, गार्गी यासारख्या ब्रह्मवेत्त्या स्त्रिया, अनेक ऋषी पत्नींनी समाजाची उत्कृष्ट व्यवस्था लावली. कारण वेद काळातही स्त्रियांना शिक्षण देण्यात येत होते. जेव्हा कोणाला तरी श्रेष्ठ ठरविण्याचा आग्रह होतो तेव्हा दुसरा आपोआपच कमी प्रतीचा किंवा आश्रित होतो. वैदिक विचारधारेने स्त्री-पुरुष दोघांनाही समान ठरविले आहे. म्हणून भारतीय लोक स्त्रीला अर्धांगिनी मानतात. प्रत्येक कार्यात तिला बरोबरीचे स्थान दिले जाते. यज्ञ, लग्न करतांना प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुषाच्या बरोबर असते. इंग्रजी भाषेतही स्त्रीला ‘बेटर हाफ’ (Better half) ठरवून समानतेचा दर्जा दिलेला दिसतो.
Published
2021-11-01